विक्रांत सावंत यांचा वाढदिवससामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. आज दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सरमळे येथील रमाई नगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे. माजगाव येथे ‘लॉरेन्स अँड मेयो’ यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ विक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरात परिसरातील २५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयाला कपाट व उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या. तर सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन वेत्ये, सोनुर्ली गावात करण्यात आले. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, काका मांजरेकर, अशोक दळवी, विजय गावडे, संजय कानसे, मृणाली कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूलचे प्राध्यापक, कर्मचारी, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page