⚡सिंधुदुर्ग दि.२७-: ठाणे येथील नरेश मस्के यांच्या आनंद आश्रम येथे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक, विकासकामे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विषयांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विकास आराखडे, जनहिताचे प्रश्न आणि विविध उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान परस्पर सहकार्य वाढवून विकासकामांना गती देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार नरेश मस्के यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली सदिच्छा भेट…
