उकाड्यापासून नागरिकांना दिलासा:बुधवारी दुपारनंतर वातावरणात गारवा, शेतकऱ्यांमध्ये समाधान..
⚡कणकवली ता.२७-: कणकवली परिसरात बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात वातावरण पाऊसमय झाले असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर शेतकरी वर्गानेही या मान्सूनपूर्व पावसाचे स्वागत केले असून आगामी पावसाळ्याची चाहूल लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसानंतर कणकवली शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळाल्याचे सांगितले.
