सरपंच बंड्या पाटील ;
झाडे लावली देखभाल दुरुस्तीचे काय..?
⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गानजिक मठ कुडाळतिठा ते पालकरवाडी नमसवाडी या मुख्य मार्गांनजिक अंडरग्राउंड विजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे.परंतु
मठ कुडाळतिठा पालकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गांनजिक कुडाळसडा येथील एरियात बऱ्याच ठिकाणी
भराव खचल्याने दिवसा व रात्रीही अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांनी केली आहे. तसेच याच रस्ता कडेला लावण्यात आलेली विविध प्रकारची जंगली झाडे पाणीपुरवठा तसेच अन्य कोणत्याच देखभाल दुरुस्तीअभावी उनमळून पडली आहेत. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली आहे.
