Headlines

वाचन लेखनाने युवा पिढी प्रगल्भ होते

वाचक प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात कवयित्री उत्तरा जोशी यांचे प्रतिपादन *⚡देवगड ता.२०-:* वाचनामुळे अनेक व्यक्तींची प्रगती झाली आहे. यामुळे वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून युवा पिढीने आपल्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर अतिरिक्त वाचन केले पाहिजे. या वाचन लेखन प्रक्रियेतून युवा पिढी प्रगल्भ होत जाईल असे मत प्रसिध्दी कवयित्री उत्तरा जोशी यांनी हुर्शी येथील शेतकरी वाचनालयामधील वाचक प्रेरणा‍ दिनानिमित्त आयोजित…

Read More

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ताराकांत शिवगण यांचे निधन

*⚡कणकवली ता.२०-:* रत्नागिरी येथील शांतीनगर रसाळवाडी येथील रहिवाशी तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ताराकांत श्रीधर शिवगण(वय 62) यांचे नुकतेच निधन झाले. ताराकांत श्रीधर शिवगण हे 2017 साली पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.त्यांनी चिपळुण,खेड,दापोली व रत्नागिरी शहर या पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई, भाऊ असा परिवार आहे.पोलीस ठाणे मालवणचे कर्मचारी सुभाष…

Read More

युवा महिला कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

*⚡मालवण ता.२०-:* मालवण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापैकी ममता तळगावकर यांची शहर युवक उपाध्यक्ष तर हर्षदा पाटील यांची शहर सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. युवा महिला कार्यकर्त्याना काँग्रेसचे मालवण शहर युवक अध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी तालुका प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुका निरीक्षक इर्षाद शेख, महिला…

Read More

सावंतवाडी-आंबेगाव एसटी पूर्वीप्रमाणे सुरू करावी

भाजपच्या प स सदस्या प्राजक्ता केळुसकर, शक्तिकेंद्र प्रमुख योगेश गवळी यांची मागणी सावंतवाडी : कोरोना काळात गावागावातील बस फेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत. सावंतवाडी आंबेगाव सकाळी ९.३० वाजता तसेच सायंकाळी ४.३० वाजता नियमित बस फेऱ्या चालू होत्या. पण कोरोना काळात या बस सेवा रद्द केल्या गेल्या. या बसफेऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त…

Read More

देवसु उपसरपंचपदी रवींद्र सावंत

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले अभिनंदन *⚡सावंतवाडी ता.२०-:* देवसू ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री रविंद्र परशुराम सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली. आज रोजी खास सभेमध्ये उपसरपंच निवडीच्या वेळी देवसु सरपंच सौ. संजना संताेष सावंत, गामसेविका साै स्वाती कदम, गामपंचायत सदस्य विजय मेस्त्री, अपर्णा सांवंत, सुचित्रा नाईक, नवनिर्वाचित उपसरपंच रविंद्र परशुराम सावंत, गामपंचायत कर्मचारी अशाेक सावंत,…

Read More

तारकर्ली पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची सर्वानुमते निवड

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली पर्यटन संस्थेच्या झालेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत विद्यमान अध्यक्ष बाबा मोंडकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पर्यटन व्यावसायिकांनी संस्था अध्यक्ष म्हणून सहदेव साळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी मिलिंद झाड, सचिव दादा वेंगुर्लेकर, खजिनदार दर्शन वेंगुर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग पर्यटन…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ८२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* कोविडमुळे एक पालक गमावलेल्या तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच विधवा महिलांच्याबाबत गृहभेटी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली….

Read More

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी मालवण डॉक्टर संघटनेचा ‘खारीचा वाटा’ उपक्रम

दुधाच्या प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंगसाठी जमा करण्याचे आवाहन *⚡मालवण ता.२०-:* सध्याच्या काळात सर्वच स्तरांवर प्रदुषण वाढत असून त्यामध्ये सर्वात जास्त हवेचे प्रदुषण आणि प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान मोठे आहे. प्रामुख्याने प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मालवण डॉक्टर संघटनेने पुढाकार घेत ‘खारीचा वाटा’ या नावाने उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या अंतर्गत दैनंदिन वापरातील दुधाच्या प्लास्टीकच्या पिशव्या गोळा…

Read More

कृषीकन्येकडून शेतक-यांना मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ला ता-:* डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सोनाली कांदळकर हिने दाभोली गावातील शेतक-यसाठी ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक विकास योजनेच्या अभ्यासांतर्गत कार्यशाळा आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. कु.सोनाली हिने कंपोस्ट खत प्रक्रिया, आंबा कोय कलम बांधणी, फळापासून आणि दूधापासून प्रक्रिया केलेले पदार्थ, जैविक बीज प्रक्रिया, भात या प्रमुख पिकावरील आढळणा-या…

Read More
You cannot copy content of this page