युवा महिला कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

*⚡मालवण ता.२०-:* मालवण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापैकी ममता तळगावकर यांची शहर युवक उपाध्यक्ष तर हर्षदा पाटील यांची शहर सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. युवा महिला कार्यकर्त्याना काँग्रेसचे मालवण शहर युवक अध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी तालुका प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुका निरीक्षक इर्षाद शेख, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्या उपस्थितीत साक्षी वंजारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आप्पा चव्हाण ,युवक जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, समीर वंजारी, हेमंत कांदळकर, हेमंत माळकर, लक्ष्मीकांत परुळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page