सावंतवाडी-आंबेगाव एसटी पूर्वीप्रमाणे सुरू करावी

भाजपच्या प स सदस्या प्राजक्ता केळुसकर, शक्तिकेंद्र प्रमुख योगेश गवळी यांची मागणी

सावंतवाडी : कोरोना काळात गावागावातील बस फेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत. सावंतवाडी आंबेगाव सकाळी ९.३० वाजता तसेच सायंकाळी ४.३० वाजता नियमित बस फेऱ्या चालू होत्या. पण कोरोना काळात या बस सेवा रद्द केल्या गेल्या. या बसफेऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होत्या. सद्यस्थितीत या बसफेऱ्या चालू नसल्याने विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य सौ प्राजक्ता केळुसकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी यांनी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांना निवेदन दिले. त्यानंतर आगार व्यवस्थापकांनी येत्या दोन दिवसात नियमित बस फेऱ्या सुरू करण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page