*⚡कणकवली ता.२०-:* रत्नागिरी येथील शांतीनगर रसाळवाडी येथील रहिवाशी तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ताराकांत श्रीधर शिवगण(वय 62) यांचे नुकतेच निधन झाले. ताराकांत श्रीधर शिवगण हे 2017 साली पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.त्यांनी चिपळुण,खेड,दापोली व रत्नागिरी शहर या पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई, भाऊ असा परिवार आहे.पोलीस ठाणे मालवणचे कर्मचारी सुभाष श्रीधर शिवगण यांचे ते भाऊ होत.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ताराकांत शिवगण यांचे निधन
