वाचक प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात कवयित्री उत्तरा जोशी यांचे प्रतिपादन
*⚡देवगड ता.२०-:* वाचनामुळे अनेक व्यक्तींची प्रगती झाली आहे. यामुळे वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून युवा पिढीने आपल्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर अतिरिक्त वाचन केले पाहिजे. या वाचन लेखन प्रक्रियेतून युवा पिढी प्रगल्भ होत जाईल असे मत प्रसिध्दी कवयित्री उत्तरा जोशी यांनी हुर्शी येथील शेतकरी वाचनालयामधील वाचक प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कृषाजी रामचंद्र करंदीकर यांच्या स्मरनार्थ स्मृती वाचक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केले. हुर्शी येथील शेतकरी वाचनालयामध्ये वाचक प्रेरणा दिनानिमित्त व कृषाजी रामचंद्र करंदीकर स्मृती वाचक सन्मान कार्यक्रमाच्यावेळी जेष्ठ समाजसेवक अविनाश गोखले,माजी शिक्षक देवधर सर,सौंदाळे हायस्कुलचे मुख्याध्यापक गणेश रानडे,संजीवनी फडके,पडेल हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक दिलीप कुमार फडके,रिध्दी रानडे,पत्रकार अयोध्याप्रसाद गांवकर,श्रीराम मराठे,विकास करंदीकर,शांताराम मुळम,सुरज देवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कवयित्री जोशी म्हणाल्या की, विदयार्थी वर्गाने सतत वाचन केले पाहिजे. वाचनामुळे प्रत्येक व्यक्तीची आकलन शक्ती तसेच बुध्दीमत्ता वाढते. तसेच आपल्या बुध्दीप्रमाणे वेगवेगळया विषयावरती लेखणी केली पाहिजे. आणि ती सोशल मिडियावरती आपल्या नावाने प्रसिध्दी केली पाहिजे. यामधून अनेक व्यक्तींचे अभिप्राय आपल्याला येत असतात त्यातूनच आपल्याला आणखीन लिखान करण्याची उर्जा निर्माण होते. सोशल मिडियाचा गैरवापरही होता नये याची देखील काळजी आपण घेवून चांगल्याच कामासाठी सोशल मिडियाचा वापर केला पाहिजे. आज अनेक लेखकांनी कविता,गझल,लेखन केलेल्या असतात ते वाचण्याचे काम वाचक करीत असतात यामुळेच लेखक कवि गझलकार यांना प्रोत्साहन मिळते. वाचक जर नसतील तर कवि व लेखकांना कधीच महत्व प्राप्त झाले नसते आज वाचकांमुळेच कवि,लेखक,गझलकार यांना महत्व आहे. विदयार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अभ्यास करीत असताना आपण अधिकारी बनण्याचा मानस सुरुवातीपासून बाळगला पाहिजे.त्या दृष्टीकोनातून वाटचाल करीत असताना व ध्येय गाठण्यासाठी अतिरिक्त वाचनही केले पाहिजे. वचनामुळे आज अनेक सनदी अधिकारी निर्माण झाले आहेत. हाच दृष्टीकोन ठेवून वाचनाच्या माध्यमातून आपणाला मोठमोठया यशाची पायरी चढता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी वाचनालयाच्या माध्यमातून करंदीकर कुटुबियांच्या मार्फत वाचकांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजिवनी फडके तर आभार गणेश रानडे यांनी मानले. फोटो- पुरळ हुर्शी शेतकरी वाचनालयातील उदघाटन प्रसंगी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम व सरस्वतीला पुष्पहार अर्पण करताना उत्तरा जोशी. छाया-रिध्दी रानडे
