नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करा

परजिल्ह्यातील विद्यार्थी असल्यास प्रवेश रद्द करावा;नगराध्यक्ष संजू परब यांची मागणी

*⚡सावंतवाडी ता.२०-:* जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश देण्यात आलेले काही विद्यार्थी हे परजिल्ह्यातील असून, मुख्य यादीतील विद्यार्थ्यांच्या रहिवासी दाखल्याची आणि रेशन कार्डची फेर तपासणी करून ते विद्यार्थी खरोखरच या जिल्ह्यातील आहेत का याची खातरजमा करून ते विद्यार्थी पर जिल्ह्यातील असल्यास त्याचे प्रवेश रद्द करण्यात यावेत. अशी मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत योग्य ती कारवाई तातडीने न केल्यास राज्य प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. परब यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page