तारकर्ली पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची सर्वानुमते निवड

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली पर्यटन संस्थेच्या झालेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत विद्यमान अध्यक्ष बाबा मोंडकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पर्यटन व्यावसायिकांनी संस्था अध्यक्ष म्हणून सहदेव साळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी मिलिंद झाड, सचिव दादा वेंगुर्लेकर, खजिनदार दर्शन वेंगुर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सहदेव साळगावकर व नवीन कार्यकारणीचा सत्कार केला. यावेळी बोलताना बाबा मोंडकर म्हणाले, तारकर्ली पर्यटन संस्थेच्या माध्यमातून किनारपट्टीवरील जलक्रीडा व होम स्टे यांना प्रशासन स्तरावर आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नाव देश विदेशात पोहोचविण्यामागे संस्थेचे खूप मोठे योगदान असून येणाऱ्या काळात नवीन संचालक मंडळाने हि जबादारी स्वीकारून पर्यटन व्यावसायिक व प्रशासन यांचा समन्वय साधून संस्थेचे कामकाज चालवावे, असेही ते म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सर्व पर्यटन व्यावसायिकांना सोबत घेऊन स्थानिक भागातील पर्यटन व्यावसायिकांना सोबत घेऊन व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रश्नावर संस्था काम करेल. यावेळी देवानंद लोकेगावकर मालवण पर्यटन महासंघ तालुका अध्यक्ष अवि सामंत, रवींद्र खानविलकर, रामा चोपडेकर, चंद्रशेखर परब, सीमाव फर्नांडिस, दीप्ती तारी व अन्य पर्यटन व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page