कृषीकन्येकडून शेतक-यांना मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ला ता-:* डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सोनाली कांदळकर हिने दाभोली गावातील शेतक-यसाठी ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक विकास योजनेच्या अभ्यासांतर्गत कार्यशाळा आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. कु.सोनाली हिने कंपोस्ट खत प्रक्रिया, आंबा कोय कलम बांधणी, फळापासून आणि दूधापासून प्रक्रिया केलेले पदार्थ, जैविक बीज प्रक्रिया, भात या प्रमुख पिकावरील आढळणा-या किडी व रोग तसेच श्री पद्धतीने भात लागवड, खतांचे व्यवस्थापन, कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती, मृदा प्रशिक्षण, शेततलाव, बियांची उगवण क्षमता, निंब अर्क, दशपर्णी अर्क व नैसर्गिक शेतीची माहिती दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य योगेश जंगले, उपप्राचार्य डॉ.सोनाली पावसकर, प्रा.विवेक खरात, प्रा.संकेत रहाटे, प्रा.सामंत, प्रा.विवेक राणे, प्रा.पाताडे, प्रा.देशपांडे, प्रा.सकपाळ, प्रा.गोपाळ गायकी यांचे मार्गदर्शन लाभले.तर दाभोली गावातील स्थानिक ग्रामस्थ, ग्रामसेवक पिगुळकर व सरपंच उदय गोवेकर यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

You cannot copy content of this page