कनक रायडर्स सायकल क्लबचा राईड फॉर फिटनेस संदेश
*⚡कणकवली ता.२०-:* सायकलिंगची आवड मुलांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी व समाजातील एक जबाबदार घटक म्हणून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी राईड फॉर फिटनेस हा संदेश देत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एकत्र येऊन 100 किलोमीटरची सायकल राईड पूर्ण केली. या राईड मध्ये कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, संजय बिडये, योगेश महाडिक, संतोष कांबळे, उमेश मोरे, प्रतीक सावंत, संदेश मयेकर, नितांत चव्हाण, बाळू मेस्त्री, सिद्धेश सावंत हे रायडर्स सहभागी झाले होते. आजचा तरुण उद्याचे देशाचे भविष्य असून आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन वाममार्गाला लागत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तर हा प्रकार आपल्या सर्वांनाच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुले सदैव मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात यासाठी आदर्श म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
