Headlines

भाजपच्यावतीने जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव

वर्क ऑर्डर नसताना नेमकी कसली भुमिपुजने केली असा उपस्थित केला सवाल *⚡सावंतवाडी ता.२५-:* दोडामार्ग-बांदा रस्त्याबाबत वारंवार आंदोलने, निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत प्र. कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, अधिकारी विजय चव्हाण यांना धारेवर धरले. वर्क ऑर्डर नसताना आमदारांच्या उपस्थितीत नेमकी भुमिपुजन कसली केली असा सवालही करण्यात आला तर जोपर्यंत…

Read More

परराज्यातून बाजारपेठेत व्यवसायासाठी येणाऱ्यांवर कारवाई करा…

स्थानिक विक्रेते सागर मठकर यांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी सावंतवाडी : बाजारपेठेत परराज्यांतून व्यवसायासाठी येणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक विक्रेते सागर मठकर यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. लॉकडाऊन नंतर बाजारपेठेत दरदिवशी परराज्यांतून येणारे भाजी, फुल व फळ विक्रेते जागोजागी आपल दुकान, गाड्या लावून परस्पर विक्री करत आहेत. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना अडचणीस सामोरे जावे लागत…

Read More

नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी रॅकेट कार्यरत

तात्काळ प्रवेश रद्द करा अन्यथा आंदोलन;भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा सावंतवाडी : नवोदय विद्यालय सांगेली मध्ये यावर्षी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश तात्काळ रद्द करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. तर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी देण्यात आलेल्या दाखल्यांमागे रॅकेट असून…

Read More

बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा

चराठा ग्रा प सदस्य अमित परब यांचे निवेदन;चिवारटेकडी येथे दिवसाचाही फिरतो बिबट्या *⚡सावंतवाडी ता.२५-:* चराठा चिवारटेकडी येथील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी वनअधिकारी यांच्याकडे केली आहे. चराठा चिवारटेकडी येथे ३० कुटुंब राहत असून येथे दिवसाढवळ्या वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read More

सावंतवाडीत किल्ला स्पर्धेचे आयोजन

मनसे चा पुढाकार *⚡सावंतवाडी ता.२५-:* दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी शहर मर्यादित भव्य किल्ला बनवणे स्पर्धेचे आयोजन दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये करण्यात आले आहे.   दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा आयोजित केली आहे तरी इच्छुकांनी 8888369066, 9423952343 ह्या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन…

Read More

मळगाव घाटीतील रस्ता धोकादायक

नूतनीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी *⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी – रेडी मार्गावरील मळगाव घाटीतील रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. ठिकठिकाणी पडलेले लहान – मोठे खड्डे, दरीच्या बाजूने खचत चाललेला भूभाग, केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुनाट वृक्ष या आणि अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पूर्णतः नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे. मळगाव…

Read More

कोरोनाने मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना तीन लाखाची मदत

मन काइंड फार्मा या औषध कंपनीची सामाजिक बांधिलकी ओरोस-:औषध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मन काईंड फार्मा या कंपनीच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत पावलेल्या सिंधुदुर्ग पोलीस विभागातील पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना सामाजिक बांधिलकी जोपासत तीन लाख रुपयांचा धनादेश  देण्यात आला.        देशातील औषध क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मनकाइंड फार्मा हिने कोविड काळातील डॉक्टर , नर्स,…

Read More

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी ग्रंथांचे वाचन करा…

अनिल सौदागर यांचे आवाहन… वेंगुर्ला प्रतिनिधी- आजच्या व्हॉटस्अॅप, मोबाईल वापराच्या युगातही पुस्तकाचे वाचन विद्यार्थी, शिक्षक तसेच वाचक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ही वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथांचे वाचन करावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला….

Read More

रेडी-गावतळेवाडी मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी तोडून रस्ता वाहतुकीस केला मोकळ *⚡वेंगुर्ले ता.२५-:* वेंगुर्ले तालुक्यातील रेडी-गावतळेवाडी येथील युवकांनी गावतळेवाडी ते मुख्य रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. रेडी-गावतळेवाडी येथील रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. या वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली…

Read More

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे १५ रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कोअर कमिटी सभेत निर्णय *⚡सावंतवाडी ता.२५-:* ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक समस्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीची सभा समिती प्रमुख नरेंद्र बिङये यांच्या उपस्थितीत पार पाङली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटनेचे…

Read More
You cannot copy content of this page