स्थानिक विक्रेते सागर मठकर यांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी
सावंतवाडी : बाजारपेठेत परराज्यांतून व्यवसायासाठी येणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक विक्रेते सागर मठकर यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. लॉकडाऊन नंतर बाजारपेठेत दरदिवशी परराज्यांतून येणारे भाजी, फुल व फळ विक्रेते जागोजागी आपल दुकान, गाड्या लावून परस्पर विक्री करत आहेत. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. परगावातील या लोकांकडून स्थानिकांना देखील दमदाटी करण्याचे प्रकार घडत असून वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांच नुकसान होत असून पर राज्यातून येणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सागर मठकर यांनी केली आहे.
