वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी ग्रंथांचे वाचन करा…

अनिल सौदागर यांचे आवाहन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- आजच्या व्हॉटस्अॅप, मोबाईल वापराच्या युगातही पुस्तकाचे वाचन विद्यार्थी, शिक्षक तसेच वाचक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ही वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथांचे वाचन करावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ.कलाम यांनी लिहिलेल्या व ग्रंथालयातील नविन खरेदी केलेल्या ललित, लेख, कथा, कादंब-या, स्पर्धा परीक्षांसाठी उुपयुक्त पुस्तके, भविष्य, खेळ, नाटक, ऐतिहासिक, काव्य अशा विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी नगरवाचनालय संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक उपस्थित होते.

You cannot copy content of this page