रेडी-गावतळेवाडी मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी तोडून रस्ता वाहतुकीस केला मोकळ

*⚡वेंगुर्ले ता.२५-:* वेंगुर्ले तालुक्यातील रेडी-गावतळेवाडी येथील युवकांनी गावतळेवाडी ते मुख्य रस्ता दूतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. रेडी-गावतळेवाडी येथील रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. या वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. तसेच या ठिकाणी जंगली प्राण्याचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने याची येथील ग्रामस्थांनी दखल घेत एक सामाजिक कार्य म्हणून श्रमदान करून येथील रस्त्याच्या बाजुला वाढलेली झाडी तोडून रस्ता मोकळा केला. त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page