चराठा ग्रा प सदस्य अमित परब यांचे निवेदन;चिवारटेकडी येथे दिवसाचाही फिरतो बिबट्या
*⚡सावंतवाडी ता.२५-:* चराठा चिवारटेकडी येथील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी वनअधिकारी यांच्याकडे केली आहे. चराठा चिवारटेकडी येथे ३० कुटुंब राहत असून येथे दिवसाढवळ्या वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमित परब यांनी केली आहे.
