Headlines

देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा..

चैत्र नवरात्र उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता.. ⚡देवगड ता.२६-:मिठबाव, कातवण आणि तांबळडेग या गावांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरात यंदाचा चैत्र नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी पुराण वाचन, गायन, कीर्तन आणि रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी पेट्रोल – डिझेल शॉर्टेज…

मठ पेट्रोलपम्प येथे पेट्रोल पुरवठा सुरु असल्याने समाधान.. ⚡वेंगुर्ला ता.२६-: तालुक्यातील एकूण पाच पेट्रोलपंप वरील पेट्रोल – डिझेल साठा आज गुरुवारी 26 मार्च रोजी दुपारपर्यंत उपलब्ध होता. दरम्यान त्यानंतर रिझर्व्ह साठा वगळता पेट्रोल डिझेल साठा पुरवठा न झाल्याने वाहनधारकांना वेटिंगवरच रहावे लागले. दरम्यान दोन ठिकाणी रात्री 10-11 वाजेपर्यंत पूर्ववत साठा उपलब्ध होईल, अशी माहिती वेंगुर्ला…

Read Full News

गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद…

सुमारे ३०० शेतकऱ्यांनी घेतला लाभ ⚡कुडाळ ता.२६-: तालुक्यात माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला. शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न…

Read Full News

हुमरमळा (वालावल) मध्ये पाच कामांची भुमिपुजने…

⚡कुडाळ ता.२६-: तालुक्यातील हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भुमीपुजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आली.हुमरमळा-वालावल गावातील विकासकामांचा ओघ कायमच सुरू असतो. यातच माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणला आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, सौ संजना गुंजकर, सौ हेमांगी…

Read Full News

कविलकाटे येथील ग्रीन-झोन उठविण्याबाबत बाबतआमदार निलेश राणे यांचे न.प. सीओ यांना आदेश…

सामील जळवी यांनी आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष… ⚡कुडाळ ता.२६-: नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदरचा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी आज कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांना निवेदन देत चर्चा केली आणि सदरचा झोन लवकर ऊठवावा अशी मागणी केली….

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ न.प. ‘घंटा गाडी’ व ‘सक्शन व्हॅन’चे लोकार्पण…

⚡कुडाळ ता.२६-: आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आज नगरपंचायतीच्या नवीन घंटा गाडी सेवा आणि सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नगरपंचायत जुन्या इमारतीचे सुशोभीकरण आणि जनरेटर सुविधेचेही उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कुडाळ शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कुडाळ नगरपंचायतीने मोठे पाऊल उचलले आहे.शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन घंटा गाड्या आणि सांडपाणी…

Read Full News

नमो उद्यान राज्यात सर्वोत्तमच ठरले पाहिजे…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये नमो उद्यानाचे भूमिपूजन :आमदार निलेश राणे यांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कानपिचक्या.. ⚡कुडाळ ता.२६-: कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला मिळालेच पाहिजे, त्यापेक्षा कमी मला काहीही मान्य नाही, अशा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायत…

Read Full News

पावसाळा जवळ आला तरी गुळदुवे येथील धोकादायक रस्ता जैसेथे…

ग्रामस्थांत नाराजीचा सूर:कोसळलेल्या रस्त्याला पिंपांचा आधार.. ⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते आरोंदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गुळदुवे – शेटकरवाडी वाडी येथील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता पावसाळा जवळ आला तरी ,या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने येथील ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे.मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती कामांबाबत येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन दुरुस्ती काम…

Read Full News

कुडाळमध्ये २७ पासून सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या उदघाटन:ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ आणि २८ मार्चला कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025 आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी…

नवीन सक्शन व्हेईकल प्राप्त कणकवली : शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हेईकल प्राप्त झाले आहे. गटार, नाले तसेच सेप्टिक टँक साफसफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. यापूर्वी साफसफाईच्या कामांमध्ये अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः सांडपाणी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणात अवलंबून…

Read Full News

You cannot copy content of this page