शिरोडा वेळागर समुद्रात कोल्हापूर गडहिंग्लज येथील युवक बुडाला…

वेंगुर्ला तहसीलदार -वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांची घटनास्थळी भेट..

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांमधून एका पर्यटकाचा खोल समुद्रात बुडण्याची ( नापत्ता ) घटना आज सायंकाळी 6.20 वाजण्याच्य| सुमारास घडली आहे . प्रणय ज्ञानेश्वर देवमाने ( वय 21, रा.गडहिंग्लज शेंद्री रोड तालुका- कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र प्रतिक शंकर बुगडे (रा. गडहिंग्लज) हा थोडक्यात बचावला आहे. कोल्हापूर गडहिंग्लज येथून 6 जण शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आले होते. यामधील प्रणय व प्रतीक हे पाण्यामध्ये उतरले होते. दरम्यान प्रणय ज्ञानेश्वर देवमाने हा बुडाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, महिला पोलीस हवालदार दीपा मठकर, योगेश मांजरेकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, सरपंच लतिका रेडकर, ग्रामस्थ आदी घटनास्थळी दाखल झाले होते. नुकतीच शिरोडा बागायत येथील एका मच्छीमाराचा बोट पलटी होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

You cannot copy content of this page