⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांमधून एका पर्यटकाचा बुडण्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.20 वाजण्याच्य| सुमारास घडली होती. प्रणय ज्ञानेश्वर देवमाने( वय 20 वर्ष, रा. गडहिंग्लज शेंद्री रोड जि. कोल्हापूर) हा समुद्राच्या पाण्याच्या लाटे बरोबर आत ओढला जाऊन समुद्राच्या पाण्यात नापता झाला होता. त्याचा मृतदेह बुधवारी 3 जून रोजी सकाळी 6 वा. शिरोडा वेळागर समुद्रकिनारी आढळून आला आहे . रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर यांनी पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रतीक शंकर बुगडे व प्रणय ज्ञानेश्वर देवमाने हे मंगळवारी सायंकाळी सुमारे 6 वा.च्या सुमारास समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यातील प्रणय ज्ञानेश्वर देवमाने हा समुद्राच्या पाण्यात बुडून मयत झालेला आहे. तर सुदैवाने त्याचा मित्र प्रतिक शंकर बुगडे हा वेळीच पोहून पाण्याबाहेर आल्याने थोडक्यात बचावला आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी सदर व्यक्तीचा मृतदेह शिरोडा समुद्रकिनारी आढळून येताच वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलीस हवालदार योगेश मांजरेकर, महिला पोलीस हवालदार दीपाली मठकर, पोलीस हवालदार प्रसाद कदम, पोलीसपाटील यांनी शिरोडा येथे दाखल होत ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून अंब्युलन्सने शवविच्छेदनसाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनेबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार प्रसाद कदम हे करीत आहेत.
शिरोडा वेळागर येथे गडहिंग्लज येथील बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला…
