*बाळकृष्ण पेडणेकर याची ठाणे, मुंबई येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्यने ठाणे,मुंबई येथे राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने त्र्याहत्तरावा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे चारशे अठ्ठ्याण्णव खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये तब्बल तीनशे चौदा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवण येथील मयुुरेेश परुळेकर व मयुुरेेश मालवणकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.
या स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये पाच राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सहा गुण केले आणि त्र्याहत्तरावा क्रमांक मिळवला. व्हिज्युअली चॅलेंज्ड विदयार्थी मयुुरेेश परुळेकर याने नऊ राऊंड्समध्ये चार राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेचार गुण केले. मयुुरेेशने आंतरराष्ट्रीय रेटिंग सत्तावीस गुणांनी वाढवले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page