
भाजप पदाधिकारी शामसुंदर उर्फ शामू दळवी यांचे अपघातात निधन…
कणकवली उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकल असा झाला अपघात.. कणकवली : भाजपचे कळसुली पंचायत समितीची शक्ती केंद्रप्रमुख श्यामसुंदर ऊर्फ शामु नाना दळवी वय ६२, राहणार कळसुली लिंगेश्वरवाडी यांचे कणकवली येथील महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोटर सायकल आणि ट्रक यांच्यात झालेला अपघातात गंभीर दुखापत होऊन निधन झाले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दळवी हे जागीच गतप्राण झाले….