पेंडूर जि. प. मतदार संघातील भाजपच्या २६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

⚡मालवण ता.२०-:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना युतीचे जागावाटप जाहीर झाल्या नंतर भाजप मध्ये नाराजी नाट्य सुरु असतानाच मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपच्या २६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी ओरोस मंडल येथील भाजपा अनेक पदाधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच धर्तीवर पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या २६ पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या मध्ये भाजपचे जिल्हा परिषद पेंडूर प्रभारी सतीश अंकुश वाईरकर, तालुका उपाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण, तालुका सरचिटणीस मिलिंद मारुती चव्हाण, पेंडूर पंचायत समिती प्रभारी चंद्रशेखर आत्माराम फोडेकर, शक्ती केंद्रप्रमुख संदीप बाळकृष्ण सरमळकर, लक्ष्मण धोंडी माडये, महेश दिगंबर वाईरकर, सिताराम अर्जुन मिठबावकर, बूथ अध्यक्ष सत्यवान बाळकृष्ण पाटील, गणेश रमेश वाईरकर, रमेश संभाजी न्हिवतकर, रमेश विजय मासये, केशव सहदेव मुसळे, कमलाकर मधुकर आजगावकर, संदीप विनोद पावसकर, महादेव राजाराम दळवी, राजेंद्र रमाकांत दळवी, रमेश सहदेव बांदिवडेकर, बाळकृष्ण चिंतामणी प्रभू, संतोष वसंत देऊलकर, गिरीश साबजी दळवी, स्वप्निल श्रीहरी नाईक, दर्शन महेश परब, वराड अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अर्जुन वसंत तळगावकर, तळगाव पंचायत समिती प्रभारी संदेश अरुण चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख सुमित अरुण सावंत या २६ पदाधिकारी यांनी राजीनामा दिला. जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर हे राजीनामा देण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page