Headlines

आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष स्मृतिदिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.२०:- आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचे संस्थापक अध्यक्ष कै.आनंद पांगम यांचा १४ वा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महादेव पांगम,शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत,पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा हर्षा मडुरकर,मुख्याध्यापक सदाशिव धुपकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.पांगम कुटुंबियांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी केले.तर हेमंत कामत,महादेव पांगम,नितिन बागवे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन निलेश देऊलकर यांनी तर श्रीम.सुषमा प्रविण मांजरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page