⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदार संघासाठी
मठ सोसायटीचे चेअरमन
सुभाष चंद्रकांत बोवलेकर हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. सोमवारी रात्री मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालय येथे
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली असून हिरवा कंदील देण्यात आला आहे, असे मठ येथील भाजपा पदाधिकारी यांनी सांगितले.या बैठकीस मठ सरपंचा रुपाली नाईक, उपसरपंच सोनिया मठकर, ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, सिद्धी गावडे, शक्तिकेंद्रप्रमुख विजय बोवलेकर, अनिल तेंडोलकर, उमेश धुरी, प्रसाद सावंत, रवींद्र खानोलकर, उमेश मठकर, स्वप्नील मठकर, दामू मठकर, बबली मठकर, पप्पू चमणकर, स्वप्नील गडेकर, जया वराडकर, महेश धुरी आदी उपस्थित होते.
आडेली पंचायत समिती मतदार संघासाठी सुभाष बोवलेकर हे भाजपाकडून इच्छुक…
