तिरोडा येथे २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२०-: तिरोडा येथील श्री देव महादेव मंदिर येथे गुरुवार दिनांक २२ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८:०० वाजता श्री गणपतीवर महाअभिषेक दुपारी ११.३० वाजता महाआरती व त्यानंतर तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८:०० वाजता श्री दत्तकृपा भजन मंडळ तिरोडा – बामणवाडी व रात्रौ ९:०० वाजता श्री देव लिंगेश्वर भजन मंडळ शिरोडा – बागायतवाडी यांचे सुश्राव्य भजन होणार असून सदर कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती तिरोडा,ग्रामस्थ यांनी केले.

You cannot copy content of this page