Headlines

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकणी संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता…

अँड परिमल नाईक यांनी पाहिले काम *⚡सावंतवाडी ता.१०-:* गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड परिमल नाईक यांनी काम पाहिले आहे.

Read More

जिमखाना स्पोर्ट्स क्लबमधील जलतरण तलाव सुरू करावा

पुजा दळवी यांची मागणी : नागरिकांच्या फायद्यासाठी शिव उद्यानमधील जिमची वेळ बदला सावंतवाडी ता.१०-:* शहरातील शिव उद्यानमध्ये असलेले ओपन जीमची वेळ स. ७ ते सायं. ५ करण्यात यावी जेणेकरून यांचा फायदा नागरिकांना घेता येईल, जिमखाना येथील स्पोर्ट्स क्लबमधील जलतरण तलाव सुरू करावा अशी मागणी सौ. पुजा दळवी यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली. यावेळी तालुकाध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश:आ. वैभव नाईक कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन) ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी. बी.एस.च्या १०० जागा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या परवानगीचे पत्र आज देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी….

Read More

जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे 15 नवीन सायकलचे वाटप….

माजी खासदार सुरेश प्रभू, संदेश बागवे आणि अभिषेक बागवे यांच्या सौजन्याने करण्यात आले वाटप… मालवण दि प्रतिनिधी जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेमध्ये माजी खासदार सुरेश प्रभू , संदेश प्रताप बागवे, अभिषेक विकास बागवे यांच्या सौजन्याने पंधरा नवीन मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष प्रताप सहदेव बागवे तसेच प्रमुख…

Read More

तळाशील येथील गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा

मालवण ता.१०-:* मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४४ वा वर्धापन दिन सोहळा दि. १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वा. अभिषेक सोहळा, सकाळी ७ वा. महापूजा, आरती व…

Read More

दुधाला चांगला भाव मिळण्यासाठी प्रयत्नशील:सतीश सावंत

द्वारका दूध व्यवसायिक संस्था दूध डेअरीचे उद्घाटन कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हरकुळ बुद्रुक येथे द्वारका सहकारी दूध व्यवसायिक संस्था चे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी सावंत यांनी बोलताना सांगितले की सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी हे कोल्हापूर येथील दूध डेअरी…

Read More

जिल्हा आणि तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आयोजन सावंतवाडी ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन व सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वर्षावरील ज्येष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा जिमखाना मैदानावर १२, १३फेब्रुवारी रोजी होणार असून या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष केनवडेकर यांनी केले आहे ही स्पर्धा सावंतवाडी अ, सावंतवाडी ब,…

Read More

नंदिनी दुध डेअरीचे संस्थापक भालचंद्र जांभेकर यांना वाहिली श्रद्धांजली

कणकवली ता.१०-:* कणकवली किंजवडे येथील नंदिनी दुध डेअरीचे संस्थापक भालचंद्र जांभेकर यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना डेअरीच्या सभासदांकडून रविवार ६ फेब्रुवारीला नंदिनी डेअरी किंजवडे येथे श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी सरपंच संतोष किंजवडेकर , भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश हरम , नंदिनी अध्यक्ष लक्ष्मण लोके , उपाध्यक्ष व बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते . कै . भालचंद्र…

Read More

सिंधुदुर्गात गुंडगिरी कोणी सुरू केले हे सर्वांना ज्ञात

आप्पा पराडकर यांच्यावर केलेली टीका खपवून घेणार नाही:राजू शेट्ये कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्गात गुंडगिरी कोणी सुरू केले हे सर्वांना ज्ञात आहे. 2005 पासून सिंधुदुर्गात खऱ्या अर्थाने आता आरोप करणाऱ्यांच्या नेत्यांनीच गुंडगिरीचे दर्शन घडवले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्षपदासह अनेक सामाजिक व राजकीयपदांवर काम करणाऱ्या निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्यावर दहशतीची टीका केल्यास…

Read More

वनविभागाने रस्त्याचे काम का बंद पाडले याचा करावा खुलासा…

अन्यथा वन कार्यालयावर काढणार मोर्चा; आंबोली सरपंच गजानन पालयेकर यांचा इशारा… आंबोली, ता.१०: येथील नांगरतास पलीकडची वाडी रस्त्याचे काम वनविभागाने बंद पाडले आहे.या आधी २ वेळा या रस्त्यावर निधी खर्च घातला असून काम झाले होते.मात्र आता वनविभागाने कोणत्या कारणास्तव हे काम अडवले आहे. याचा खुलासा करावा अन्यथा वन कार्यालयावर तेथील लोकांना घेवून मोर्चा काढण्याचा इशारा…

Read More
You cannot copy content of this page