माजी खासदार सुरेश प्रभू, संदेश बागवे आणि अभिषेक बागवे यांच्या सौजन्याने करण्यात आले वाटप…
मालवण दि प्रतिनिधी जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेमध्ये माजी खासदार सुरेश प्रभू , संदेश प्रताप बागवे, अभिषेक विकास बागवे यांच्या सौजन्याने पंधरा नवीन मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष प्रताप सहदेव बागवे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विलास हडकर मालवण, तसेच विलास त्रिंबककर सरपंच ग्रामपंचायत त्रिंबक, श्रीकांत बागवे अध्यक्ष त्रिंबक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, सुरेन्द्र सकपाळ कार्यवाह माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक, अशोक बागवे , एकनाथ घाडीगावकर संचालक माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक, सुरेश गंगाराम पवार सहाय्यक शिक्षक जनता विद्या मंदिर त्रिंबक, प्रवीण घाडीगावकर मुख्याध्यापक जनता विद्या मंदिर त्रिंबक, सौ अर्चना बागवे माजी शिक्षिका, राजू परब, पोलीस पाटील सिताराम सकपाळ, शत्रुघ्न त्रिंबककर, चंद्रकांत त्रिंबककर , प्रशालेतील सर्व शिक्षक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या सौजन्याने श्री विलास हडकर यांनी प्रशालेला दहा सायकल भेट देऊन इवलसं रोपटं लावलं होतं त्यामध्ये बागवे बंधूनी आणखीन पंधरा सायकलची भर घालून या रोपट्याचे झाड बनवले आहे, त्यामुळे प्रशालेच्या सायकल बँकेमध्ये आता २५ सायकल जमा झालेल्या आहेत. मान्यवरांनी या झाडाचा मोठा वटवृक्ष व्हावा अशा प्रकारचे मनोदय कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
