अन्यथा वन कार्यालयावर काढणार मोर्चा; आंबोली सरपंच गजानन पालयेकर यांचा इशारा…
आंबोली, ता.१०: येथील नांगरतास पलीकडची वाडी रस्त्याचे काम वनविभागाने बंद पाडले आहे.या आधी २ वेळा या रस्त्यावर निधी खर्च घातला असून काम झाले होते.मात्र आता वनविभागाने कोणत्या कारणास्तव हे काम अडवले आहे. याचा खुलासा करावा अन्यथा वन कार्यालयावर तेथील लोकांना घेवून मोर्चा काढण्याचा इशारा आंबोली सरपंच गजानन पालेकर यांनी दिला आहे.गेल्या महिन्यात आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून या कामाचे उद्घाटन झाले होते.याबाबत सरपंच गजानन पालेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून याबाबत माहिती दिली आहे.
आंबोली ग्रामपंचायत सदस्य आणि मागच्या वेळी आपण सरपंच असताना २ वेळा या रस्त्याचे काम झाले.गेल्या महिन्यात याच रस्त्याचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांनी केले आमदार निधीतून हे काम आहे..वनविभागाने हे काम अडवले आहे. २ वेळा काम झाले.निधी खर्च झाला.आणि आताच वनविभाग का तिथे आडकाटी घेत आहे. आंबोली घाटात वनराई बंधारे घातले तेथे राखीव वनक्षेत्रात खोदकाम केले,झाडी तोडली,आंबोली वनविभागाच्या जमिनीत २ कवॉटरस् बांधल्या.त्यावेळी जेसीबी लावून झाडे तोडून खोदकाम केले त्यावेळी कोणाची परवानगी घेतली होती.सिंधुदुर्गात आंबोलीत वनखात्याने उच्छाद मांडला आहे. इथे सर्वसामान्य माणसाला या विभागाकडून त्रास होतो.जिल्ह्यात सर्वाधिक जागा देखील वनविभागाने आंबोलीत बळकावली आहे.अलीकडे १४०० एकर जागा देखील घेवून वनविभाग आडमुठी भूमिका घेवून इथले रस्ते देखील अडवून नागरिकांना त्रास होत असेल तर या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल.आंबोलीत जंगल तोड करून जमिनी लाटल्या जातात तिथे वनविभाग कुठे आहे..लाकूड तोड करून मोठ्या व्यावसायिकांना विकल जाते तेव्हा कुठे. वनविभागाची भूमिका ही अन्यायकारक असून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.त्यांनी काम का अडवले याचा लेखी खुलासा करावा तसेच याआधी रस्ता असताना आता काम का अडवले याचा खुलासा करावा अन्यथा मोर्चा काढणार असल्याचे सरपंच गजानन पालेकर यांनी म्हटले आहे….
” आंबोली फौजदार वाडी ओवळीची मोरी हा मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता एकदम निकृष्ट झाला असून ठेकेदाराची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही.जनतेचा पैसा आहे काम दर्जेदार व्हावे हे इथल्या ग्रामस्थांची मागणी योग्य आहे.खाजगी काम असल्याचे बडेजाव कोणाचे खपवले जाणार नाहीत.ग्रामपंचायती कडे देखील अनेक तक्रारी रस्त्याबबत आल्या आहेत.ठेकेदाराने निकृष्ट काम केले आहे.आमदार दीपक केसरकर यांनी अशा कामाला आणि ठेकेदाराला पाठीशी घालणे आणि पोलिसाना घेवून काम करायला सांगणे हे शोभत नाही.दर्जेदार काम झाले पाहिजे हा ग्रामस्थांचा हक्क आहे.६ महिन्यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुखांनी आंबोलीत आणि सावंत वाडीत पत्रकार परिषद घेवून या रस्त्याची चौकशी लावणार असे सांगितले होते.कुठेही चौकशी झाली नाही. उंदराला मांजर साक्षी असे दाखवायचा हा प्रकार आहे. बोगस काम खापवून घेतले जाणार नाही.तसेच आंबोलीत लोकांनी आता यावरून रंग ओळखले असल्याचा टोला लगावला आहे.
