आप्पा पराडकर यांच्यावर केलेली टीका खपवून घेणार नाही:राजू शेट्ये
कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्गात गुंडगिरी कोणी सुरू केले हे सर्वांना ज्ञात आहे. 2005 पासून सिंधुदुर्गात खऱ्या अर्थाने आता आरोप करणाऱ्यांच्या नेत्यांनीच गुंडगिरीचे दर्शन घडवले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्षपदासह अनेक सामाजिक व राजकीयपदांवर काम करणाऱ्या निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्यावर दहशतीची टीका केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा हिंद भारतीय व राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी दिला आहे.
देवगड जामसंडे न.प.च्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीमार्फत आप्पा पराडकर यांच्यासमवेत मुंबई व परजिल्ह्यातील काही गुंड प्रवृत्तीची माणसे उपस्थित होती तसेच गुंड आणून दहशत माजवण्याचा आरोप भाजपने केला होता. याला उत्तर देताना राजू शेट्ये म्हणाले,निलेश उर्फ आप्पा पराडकर हे आमचे नेते आहेत.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना,हिंद भारतीय कामगार सेना,सिने डान्सर असो.
मुंबई या संघटनांचे अध्यक्ष म्हणून आप्पा पराडकर काम पहात आहेत.त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेले सहकारी हे माथाडी कामगार सेनेचे व अन्य संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे भाजपाने आरोप करताना विचार करावा असा सल्ला देताना राजू शेट्ये म्हणाले, सिंधुदुर्गात 2005 पासून गुंडगिरी सुरू झाली याला कारणीभूत कोण आहेत याचा विचार भाजपने करावा.सेनेत असताना यांचे नेते कोणती संस्कृती जोपासत होते.सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हल्ला करताना यांना गुंडगिरी दिसली नाही.
अनेक हत्या पचवल्या गेल्या त्यावेळी गुंडगिरी कोणाची होती? असा सवाल करताना आप्पा पराडकर यांनी आतापर्यंत जिल्ह्यात वातवरण दूषित करणारा एक तरी प्रकार घडविला आहे का? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे.मगच आमच्या नेत्यांवर आरोप करावेत.नाहक केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही.असा इशारा त्यांनी दिला
