नंदिनी दुध डेअरीचे संस्थापक भालचंद्र जांभेकर यांना वाहिली श्रद्धांजली

कणकवली ता.१०-:* कणकवली किंजवडे येथील नंदिनी दुध डेअरीचे संस्थापक भालचंद्र जांभेकर यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना डेअरीच्या सभासदांकडून रविवार ६ फेब्रुवारीला नंदिनी डेअरी किंजवडे येथे श्रद्धांजली वाहण्यात आली .

यावेळी सरपंच संतोष किंजवडेकर , भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश हरम , नंदिनी अध्यक्ष लक्ष्मण लोके , उपाध्यक्ष व बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते . कै . भालचंद्र जांभेकर डेअरीचे १५ वर्षे संस्थापक अध्यक्ष होते . त्यांनी किंजवडे व परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे स्वप्न डेअरी माध्यमातून पूर्ण केले ते आत्मा संस्थेचे माजी तालुकाध्यक्ष होते . किंजवडे तंटामुक्तीचे अध्यक्ष , पाणलोट प्रकल्प अध्यक्ष होते . त्यांनी देवस्थान इमान प्रश्न सोडवण्यासाठी खास प्रयत्न करून गावाच्या विकासासाठी कार्य केले होते .

You cannot copy content of this page