Headlines

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

सिंधुदुर्ग ता.०१-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक ०२ एप्रिल २०२२ *सकाळी १२.३० वाजता -* कै.डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम माठेवाडा,(ता. सावंत वाडी) येथे हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.सोईनुसार तेजस एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Read More

धान्य विक्री केंद्रावरील ई पॉस मशीन तहसीलदारांच्या स्वाधीन…

ग्रामीण भागातील नेटवर्क सुविधेला कंटाळून मशीन दिल्या परत… सावंतवाडी ता.०१: ग्रामीण भागात सक्षम नेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ई पॉस मशीनद्वारे धान्य विक्री करताना येणाऱ्या अनेक अडचणी व इतर प्रलंबित समस्यांबाबत शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही त्यामुळे संतप्त रेशन धान्य दुकानदारांनी आज ई पॉस मशीन येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त…

Read More

म्युझिक काॅर्नर इलेक्ट्रॉनिक अॅण्ड मोबाईल शाॅपी

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 *गुढीपाडव्याची वाढवा रंगत* 🎊 🎊 *बहरेल आनंदाची संगत* 🎊 💿 *म्युझिक काॅर्नर इलेक्ट्रॉनिक अॅण्ड मोबाईल शाॅपी* 💿 🎉 *गुढीपाडव्याची निमित्त खास ऑफर* 🎉 🤷🏻‍♀️फक्त रूपये *101/-* भरा आणि घेऊन जा📱 *मोबाईल, 🖥️LED TV व 🧼AC* 📱 कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू 🎁 🥳💿🥳💿🥳💿🥳💿🥳💿🥳 🥳( ऑफर कालावधी गुढी पाडवा ते अक्षय तृतीया…

Read More

नांदगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेला वाळु व्यावसायिक कंपनी मार्फत पंप सुपूर्द

कणकवली ता.०१-:* पियाळी नदीपात्र शेजारी अवैद्य सिलिका वाळू वाशिंग प्लांट चे दुषित पाणी वारंवार सोडून नांदगाव ग्रामपंचायतचा नळपाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाला होता. तो आज वाळु व्यावसायिक कंपनी एम.एम .सी मार्फत 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा पंप सुपूर्द करण्यात आला आहे. याबाबत नांदगाव ग्रामपंचायत सरपंच आफ्रोजा नावलेकर ,उपसरपंच निरज मोरये, पंचायत समितीच्या सदस्या सौ…

Read More

सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताखाली घरतोडीबिल्डर लॉबीची कणकवलीत दांडगाई

शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आरोप;पोलिसांची भूमिका संशयास्पद कणकवली ता.०१-:* कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तखाली काही घरतोडीडी बिल्डर लॉबीची कणकवलीत दांडगाई सुरु झाली आहे.कणकवली शहरातल्या काही मोक्‍याच्या जागा ,जमीन, मिळकती आणि बिल्डिंग शोधण्याचे काही नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचे भाऊबंद यांना हे काम सोपविण्यात आलेले आहे. लोकांच्या जमिनी बळकावणे, जमीन मालकांची अडवणूक करणे, काही ठराविक बिल्डर लॉबीशी संगनमत…

Read More

आरोस इसवटी ब्राह्मण मंदिरात उद्या धार्मिक कार्यक्रम

बांदा ता.०१-:* आरोस श्री देव इसवटी ब्राह्मण मंदिरात शनिवारी 2 एप्रिल रोजी गुडीपाडवा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे संध्याकाळी 4 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Read More

सावंतवाडीत होणाऱ्या ‘जनवादी साहित्य-संस्कृती संमेलना’च्या स्वागताध्यक्षपदी संजय वेतुरेकर यांची निवड..

सावंतवाडी ता.०१-:* ७ व ८ मे रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी समाजवादी चळवळीतील लढाऊ नेते संजय वेतुरेकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई, सेक्रेटरी अंकुश कदम व कार्याध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रात याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. समाजवादी विचार परंपरेचा झेंडा खांद्यावर घेवून शिक्षण…

Read More

आरोग्य सुधारून पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास करणे गरजेचे…

पतंजली ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गोवेकर यांचे प्रतिपादन… सावंतवाडी ता.०१-: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने योगाभ्यास करण्याची गरज आहे असे उद्गार पतंजली परिवाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा सुभाष गोवेकर यांनी योग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी साधकांना मार्गदर्शन करतेवेळी काढले गुढीपाडवा नव वर्षाचे औचित्य साधून 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत विठ्ठल मंदिर येथे…

Read More

कणकवली येथे उद्या हिंदु नववर्ष स्वागत यात्रा

कणकवली ता.०१-:* कणकवली शहरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीने २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता ‘ हिंदु नववर्ष स्वागत यात्रे’चे आयोजन केले आहे.  या स्वागत यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार आहे.  या स्वागत यात्रेत रथारूढ भारतमाता, वारकरी दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज, सजवलेल्या बैलगाडया, ढोलपथक, ध्वजपथक, लेझीम पथक, वेगवेगळी रूपे धारण केलेली…

Read More

कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०१-:* कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून दि. १० एप्रिल रामनवमी पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त २ एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. या दिवसापासून दररोज नऊ दिवस सकाळी १० वा. नूतन पंचांग वाचन व रात्री ९ वा. पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा व कीर्तन होणार आहे. तर १०…

Read More
You cannot copy content of this page