नांदगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेला वाळु व्यावसायिक कंपनी मार्फत पंप सुपूर्द

कणकवली ता.०१-:* पियाळी नदीपात्र शेजारी अवैद्य सिलिका वाळू वाशिंग प्लांट चे दुषित पाणी वारंवार सोडून नांदगाव ग्रामपंचायतचा नळपाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाला होता. तो आज वाळु व्यावसायिक कंपनी एम.एम .सी मार्फत 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा पंप सुपूर्द करण्यात आला आहे. याबाबत नांदगाव ग्रामपंचायत सरपंच आफ्रोजा नावलेकर ,उपसरपंच निरज मोरये, पंचायत समितीच्या सदस्या सौ .हर्षदा वाळके तसेच सदस्य ग्रामस्थ यांच्यावतीने तहसिलदार यांच्या समोर एक दिवसीय आंदोलन झाले होते.याची दखल घेत सिलिका वाळू कंपनी यांच्यामार्फत नांदगाव ग्रामपंचायत ला नळयोजना पंप नव्याने वितरण करण्यात आले आहे.

यासाठी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती प्रकाश पारकर , तहसिलदार आर.जे .पवार तसेच नांदगाव पंचायत समितीच्या सदस्या सौ. हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नाने पंप नव्याने वितरण करण्यात आला आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश पारकर बोलताना म्हणाले की,काही दिवस पियाळी नदीचे पाणी दुषित होवून त्याचा दुष्परिणाम होत होता हे खरेच होते.फक्त सदर दुषित पाणी कोणता वाळू व्यावसायिक सदर दुषित पाणी वारंवार सोडत होता याचा पुरावा मिळत नसल्याने सर्व व्यवसायीक भरडले जात होते.तरी माझी सर्वांना विनंती आहे की,जर पुन्हा असं काही दुषित पाणी प्रकार आढळून आल्यास जसे आजपर्यंत सहकार्य केले तसेच याही पुढे सहकार्य करावे कारण जवळपास 25 पेक्षा अधिक गावातील व्यवसायीकांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे.तेव्हा आम्ही वाळु व्यावसायिक कंपनी एम.एम .सी मार्फत 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा पंप नांदगाव ग्रामपंचायतला सुपूर्द करण्यात आले आहे.तरी याही पुढे असे सहकार्य असणार असून जो कोणी नदीचे पाणी गढुळ करण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे शेवटी प्रकाश पारकर यांनी सर्व वाळू व्यावसायिक यांच्या वतीने ग्वाही दिली आहे.

यावेळी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,भाई मोरजकर, कमलेश पाटील, रज्जाक बटवाले,ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित स्वागत सरपंच आफ्रोजा नावलेकर तर प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page