पतंजली ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गोवेकर यांचे प्रतिपादन…
सावंतवाडी ता.०१-: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आणि पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने योगाभ्यास करण्याची गरज आहे असे उद्गार पतंजली परिवाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा सुभाष गोवेकर यांनी योग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी साधकांना मार्गदर्शन करतेवेळी काढले
गुढीपाडवा नव वर्षाचे औचित्य साधून 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत विठ्ठल मंदिर येथे पतंजली योग समितीच्या वतीने योग महोत्सवाचे आयोजन केले आहे या योग महोत्सवाचे उद्घाटन करताना प्रा गोवेकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर, जिल्हा भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष महेश भाट, पतंजलीचे समन्वयक विकास गोवेकर उपस्थित होते प्रा सुभाष गोवेकर पुढे म्हणाले आजच्या बिघडलेल्या पर्यावरणामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे मानव प्राण्याचे आरोग्य बिघडून गेले आहे तसेच त्यांचे आयुष्यही कमी होत चालले आहेत अशा परिस्थितीत सर्वांनीच योग प्राणायाम आयुर्वेद व निसर्गोपचाराचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे.
ॲड दिलीप नार्वेकर यांनी आपले योगानुभव कथन केले दत्तात्रय निखार्गे यांनी प्राणायामाचे सत्र घेतले यावेळी वयाची 75 वर्षे पूर्ण होऊनही विविध संस्थांवर सक्षम पणे काम करणारे प्रा सुभाष गोवेकर पतंजलीचे सर्व उपक्रम तळमळीने राबवणारे स्थायी वर्गाचे संचालक रामनाथ सावंत महादेव परब व दिलीप भाईप यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला केंद्र शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक रावजी परब यांनी सर्वांचे आभार मानले
