मालवण ता.०१-:* कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून दि. १० एप्रिल रामनवमी पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त २ एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. या दिवसापासून दररोज नऊ दिवस सकाळी १० वा. नूतन पंचांग वाचन व रात्री ९ वा. पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा व कीर्तन होणार आहे.
तर १० एप्रिल रोजी रामनवमी साजरी होणार असून सकाळी ११ वा. श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. पुराण वाचन, पोथीपूजन, पालखी प्रदक्षिणा, मर्दानी खेळ, कीर्तन व त्यानंतर न्हीवे ग्रामस्थ यांचे नाट्य सादर होणार आहे.
११ एप्रिल रोजी सकाळी लळीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्त मंडळ, मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.
