महागाई विरोधात सावंतवाडीत राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन…

गॅस सिलेंडर व मोटरसायकलला पुष्पहार घालून केला निषेध…

सावंतवाडी ता.०१-:* देशात दरदिवशी वाढत असणाऱ्या गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सावंतवाडी काँग्रेसकडून आज केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी दरवाढी विरोधात आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोटारसायकल, गॅस सिलेंडर यांना पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर तालुका अध्यक्ष महेंद्र सांगोलकर, उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी महिला तालुकाध्यक्ष स्मिता वागळे, शहराध्यक्ष राघू नार्वेकर समीर भाट, कौस्तुभ गावडे जास्मिन शेख,अम्मीदी मिस्त्री, सुमेदा सावंत, बबन डिसोझा, एडवोकेट संभाजी सावंत, राज पेडणेकर, कौस्तुभ गावडे, इंद्रनील अंघोळकर, दीपक पिरणकर, राकेश मडवळ, मोहसीन मुल्ला, रफिक नाईक, संतोष मडगावकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page