आवर्तना’त रंगला रघुकुल स्वरविहारचा १३ वा वर्धापन दिन…
रागदारीवर आधारित रचनांनी रसिकांवर स्वराभिषेक :वर्धापन दिन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती.. कुडाळ : एखाद्या शहराला सांस्कृतिक चेहरा प्राप्त होत जातो, तेव्हा त्या शहराची वेगळी ओळख निर्माण होते. त्या शहरातील नागरिकही कला अंगाने समृद्ध होत जातात. अश्याच सावंतवाडी शहरातील शास्रोक्त अर्थात शास्त्रीय संगीताचे उत्तम धडे देणाऱ्या “रघुकुल स्वरविहार” संस्थेला ११ एप्रिल २०२६ रोजी १३वर्षे पूर्ण झाली….
