Headlines

अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाविरोधात २५ जूनला सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: अनुसूचित जाती जमाती मधील समाविष्ट असणाऱ्या जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरू केल्याने सदर उपवर्गीकरण अन्यायकारक व जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याने त्याला तीव्र विरोध करण्यासाठी २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व जमाती मधील समाविष्ट असलेल्या जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अन्यायकारक घाट घातला असल्याने या निर्णयाविरोधात सामाजिक संघटना पदाधिकारी यांची सभा ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे श्री.महेश परुळेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.सदर सभेत आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय दिन पूर्व दिनी गुरुवार दि.२५ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे भव्य धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला.
सदर सभेस संविधानिक हितकारीणी महासंघाचे अध्यक्ष महेश परुळेकर,कार्याध्यक्ष रमाकांत जाधव,जिल्हा संघटक अंकुश जाधव,उपाध्यक्ष Adv.एस.के.चेंदवणकर ,चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग चे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,समिती प्रमुख सुरेश पवार,सहसचिव बाळकृष्ण नांदोसकर,महासंघाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी गौतम खुडकर,संदीप जाधव,शंकर जाधव,सूर्यकांत साळुंके,विश्वनाथ पडेलकर,दिलीप वाडेकर,बहुजन मुक्ती पार्टीचे सिंधुदुर्ग अध्यक्ष के.एस.कदम,बामसेफ चे अध्यक्ष भालचंद्र जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे शरद कांबळे,मोहन माजगांवकर,चंद्रशेखर जाधव तसेच पी.के.वाडेकर,देवदत्त कदम,वासुदेव जाधव,मधुकर जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page