Headlines

चिटणीस नाका येथील विद्युत तारा कोसळल्या

अचानक आलेल्या वाऱ्याने घडली घटना;मालवाहू गाडीवर कोसळल्या;मात्र अनर्थ टळला सावंतवाडी ता.०५-:* अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शहरातील चिटणीस नाका परिसरातील विद्युत तारा खाली कोसळल्या असून, या तारा रस्त्यावरून जाणाऱ्या एका मालवाहू गाडीवर पडल्या आहेत. हा प्रकार आज रात्री पावणे नऊच्या सुमारास घडला आहे. त्या रस्त्यावरून त्यावेळी कोणी पादचारी किंवा अन्य गाडी जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली…

Read More

६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ललित हरमलकर आणि गणेश राऊळ कडे सिंधुदुर्गचे नेतृत्व…

सावंतवाडी ता.०५-:* स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा येथे ४ एप्रिल पासून सुरू झालेल्या ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व सावंतवाडीतील मल्लसम्राट प्रतिष्ठान चे पैलवान ललित हरमलकर व पैलवान गणेश राऊळ करत आहेत. ही स्पर्धा ९ एप्रिल पर्यंत असणार आहे.

Read More

रयत वायरी विविध कार्यकारी सेवा संस्थेवर भाजपचे बिनविरोध वर्चस्व…

भाजपचे ८ तर महाविकास आघाडीचे ४ उमेदवारांची बिनविरोध निवड मालवण : (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील रयत वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलची सरशी झाली आहे . बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ८ संचालकाच्या जागा आपल्या ताब्यात राखण्यात भाजपला यश आले असून महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल चे चार संचालक बिनविरोध…

Read More

आमदार दीपक केसरकर उद्या विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

सावंतवाडी ता.०५:-* मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर उद्या विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, उद्या गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी नगरपालिका येथे विकास कामांबाबत मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सिंधुरत्न योजनेबाबत एनयूइलएम महिला बचत गट, मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६:५० वाजता…

Read More

डॉ मेघा अंधारी यांच्या बदलीसाठी उपोषण

मोरगाव सरपंच, उपसरपंच यांचा इशारा दोडामार्ग ता.०५-:* गेल्या बारा वर्षापासून मोरगांव जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या डाॅ.मेघा अंधारी यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील रूग्ण यांना सहकार्य मिळत नाही या ठिकाणी निवास्थान असून ते बांदा येथे राहातात रुग्णांना गरजेच्या वेळी उपलब्ध होत नाही असा आरोप गावातील ग्रामस्थ यांनी केला होता या नुसार ग्रामपंचायत कडून तक्रारीची दखल…

Read More

बैल झुंज स्पर्धेतील दोघा पारितोषिक पुरस्कर्त्याना पोलिसांनी केली अटक

न्यायालयाने त्यांची केली जामिनावर मुक्तता मालवण ता.०५-:* गेले आठवडाभर गाजत असलेल्या तळगाव येथील बेकायदेशीर बैल झुंज प्रकरणातील स्पर्धेचा विजेता चषक काल मालवण पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर या स्पर्धेची पारितोषिके पुरस्कृत करणाऱ्या सुनील सुभाष मांजरेकर आणि अनिल सुभाष मांजरेकर या दोघा संशयितांना मालवण पोलिसांनी आज मंगळवारी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी सात…

Read More

महसूल कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने सिंधुदुर्गनगरी ता ०४ महाराष्‍ट्र राज्‍य महसुल कर्मचारी संघटना जिल्‍हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सोमवार ४ एप्रिल पासून आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आजच्या दूसऱ्या दिवशीही महसुल कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी ४ एप्रिल पासून संप पुकारुन येथील…

Read More

जिल्हा बॅंकेच्या दुग्धविकासाच्या सुबक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. – श्री. व्हिक्टर डान्टस.

मालवण दि ( प्रतिनिधी ) ” आर्थिक शिस्त असेल तर कोणतीही संस्था मोठी होण्यास वेळ लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेने दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी अतिशय सुबक अशी कर्ज योजना दोनच दिवसांपुर्वी जाहीर केली आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ उठवावा आणि दुग्धोत्पादन वाढवावे. जिल्हा बॅंकेच्या दुग्धविकासाच्या सुबक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक…

Read More

राजन तावडे यांच्यातर्फे मोफत शैक्षणिकक साहित्य वाटप

वेंगुर्ला ता.०५-:* उभादांडा-भेंडमळा शाळेत मुलांना पाल गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते, गरजू, अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणारे राजन तावडे यांच्या मार्फत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील प्रत्येक मुलाला दप्तर, मुबलक वह्या, पॅड, कंपास पेटी इत्यादी साहित्य तसेच शाळेला मोफत ट्युब लाईट, फॅन प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास त्यांचे सहकारी संजय गावडे, सुरेंद्र…

Read More

भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन

वेंगुर्ला ता.०५-:* भाजपाचे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिश धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्याची भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल हा भाजपा स्थापना दिवस ते १० एप्रिलपर्यंत अभिमान अभियान प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये साजरे करण्याचे, डॉ.बाबासाहेब…

Read More
You cannot copy content of this page