वेंगुर्ला ता.०५-:* भाजपाचे कोकण व गोवा राज्याचे संघटन मंत्री सतिश धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्याची भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल हा भाजपा स्थापना दिवस ते १० एप्रिलपर्यंत अभिमान अभियान प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये साजरे करण्याचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती घेण्याबाबत, बुथरचना व शक्ती केंद्र सक्षम बनवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्थापना दिनी पंतप्रधान मोदी यांचे विचार प्रत्येक बुथवर पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्यासह प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, शितल आंगचेकर, स्मिता दामले, सोमनाथ टोमके, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रशांत आपटे, राजेश कांबळी, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, बाबली वायंगणकर, लक्ष्मीकांत कर्पे, पपू परब, प्रणव वायंगणकर, नारायण कुंभार, वृंदा गवंडळकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, ज्ञानेश्वर केळजी, रविद्र शिरसाठ, शेखर परब आदी उपस्थित होते.
