वेंगुर्ला ता.०५-:* वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिर नजिकच्या आंबार्डेकर यांच्या निवासस्थानी रविवार दि. १० एप्रिल रोजी अस्थमा कॅम्प आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात सकाळी १० वाजता डॉ.गुप्ता हे अस्थमा रुग्णांची तपासणी करतील. आवश्यक असणा-यांना कंपनीकडून प्राप्त झालेले इनेलर आणि औषधे दिली जातील. तसेच मूळव्याध, संधिवात, हॅड्रोसील, हृदयरोग, मधुमेह, अॅपेंडीस, काविळ व जुने आजार असणा-या रुग्णांची आयुर्वेद व नाडी परिक्षण पद्धतीने तपासणी करतील. रुग्णांनी नावनोंदणी ब्रह्मकुमारीज विद्यालय, गणेश कॉम्प्लेक्स येथे प्रत्यक्ष किवा ९४२३३०२११५ आणि ९४२२८७०६८२ या नंबरवर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
