कणकवली ता.०५-:* “शालेय पुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्यसाठी सर केलेल्या गड किल्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना “पावनखिंड ” या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाल्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडेल ” असे उदगार सिंधुदुर्ग जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी काढले.वारगाव माजी उपसरपंच नाना शेट्ये यांच्या सौजन्याने खारेपाटण केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कणकवली येथील लक्ष्मी चित्र मंदिर येथे मोफत आयोजित करण्यात आलेल्या “पावनखिंड ” चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,पं.स.सदस्या सौ. तृप्ती माळवदे,वारगाव गावचे माजी उपसरपंच नाना शेट्ये,इरफान मुल्ला,ग्रा प सदस्य शमशुद्दीन काझी,सौ उज्वला चिके, खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ गौरी शिंदे,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,सुभाषचंद्र प्रभुदेसाई,तेजस जमदाडे,अभिमन्यू पातडे, संदेश नर,अमोल तळगावकर,गुरुप्रसाद शिंदे,दादा जाधव,केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल,खारेपाटण केंद्रशाळेचे मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर रामेश्वर नगर जिं प शाळेच्या मुख्यध्यापिका सौ छाया पडोळकर तसेच खारेपाटण केंद्रातील शालेय विद्यार्थी,शिक्षक,पालक आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी खारेपाटण बसस्थानक येथे खारेपाटण केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना कणकवली येथील चित्रपटगृहात “पावनखिंड ” चित्रपट पाहण्यासाठी खाजगी वाहनाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जि. प. सदस्य रवींद्र जठार व नाना शेट्ये यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तर कणकवली येथे लक्ष्मी चित्रमंदिर चित्रपट गृहाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या स्वागत समारंभ वेळी प्रमुख उपस्थिती असलेल्या जि.प.अध्यक्षा सौ संजना सावंत यांचे खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले.
