वेंगुर्ला ता.०५-:* उभादांडा-भेंडमळा शाळेत मुलांना पाल गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते, गरजू, अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणारे राजन तावडे यांच्या मार्फत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेतील प्रत्येक मुलाला दप्तर, मुबलक वह्या, पॅड, कंपास पेटी इत्यादी साहित्य तसेच शाळेला मोफत ट्युब लाईट, फॅन प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमास त्यांचे सहकारी संजय गावडे, सुरेंद्र वारंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन पडवळ, भेंडमळा विकास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नवार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पडवळ, आनंद नवार, प्रसाद तुळसकर, जयराम खानोलकर, महिला बचत गटाच्या मेस्त्री, तृप्ती काळसेकर, मनाली साळगावकर, सर्व पालक, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक तुळशीदास पाटकर यांनी केले तर आभार शिक्षक संतोष राऊत यांनी मानले.
