भाजपचे ८ तर महाविकास आघाडीचे ४ उमेदवारांची बिनविरोध निवड
मालवण : (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील रयत वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलची सरशी झाली आहे . बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ८ संचालकाच्या जागा आपल्या ताब्यात राखण्यात भाजपला यश आले असून महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल चे चार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीनंतर संस्थेच्या अध्यक्षपदी हरीश गावकर तर उपाध्यक्षपदी संजय लुडबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रयत वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, वायरी ता. मालवण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम येथील लायब्ररी शाळा येथे मंगळवारी निश्चित करण्यात आला होता. मात्र भाजपा आणि महाविकास पदाधिकारी यांनी निवडणूक बिनविरोध केली. भाजपाकडे ८ जागा तर महाविकास आघाडीकडे ४ जागा आल्या. संचालक मंडळात साईनाथ रामचंद्र चव्हाण, मनोज मंगलदास लुडबे, अरुण दत्ताराम तळगावकर, दिनकर विनायक मसुरकर, जगदीश दिगंबर गावकर, कृष्णा पांडुरंग चव्हाण, हरीश वसंत गावकर, संगीता गोविंद मुंबरकर, प्रणिता प्रमोद लंगोटे, श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, मनोहर नामदेव मालवणकर हे १२ जण बिनविरोध निवडून आले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष हरीश गावकर, उपाध्यक्ष संजय लुडबे आणि संचालक मंडळाचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा लुडबे, संस्थेचे सचिव योगेश चव्हाण, उदय गावकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, जॉमी ब्रिटो यांच्यासह भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
