आमदार दीपक केसरकर उद्या विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

सावंतवाडी ता.०५:-* मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर उद्या विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, उद्या गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी नगरपालिका येथे विकास कामांबाबत मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत.

त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सिंधुरत्न योजनेबाबत एनयूइलएम महिला बचत गट, मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६:५० वाजता वेंगुर्ला नगरपरिषद येथे सिंधुरत्न योजनेबाबत एनयूइलएम महिला बचत गट, मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते सोयीनुसार सावंतवाडी येथील निवासस्थानी येण्यासाठी वेंगुर्ला येथून निघणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे

You cannot copy content of this page