डॉ मेघा अंधारी यांच्या बदलीसाठी उपोषण

मोरगाव सरपंच, उपसरपंच यांचा इशारा

दोडामार्ग ता.०५-:* गेल्या बारा वर्षापासून मोरगांव जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या डाॅ.मेघा अंधारी यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील रूग्ण यांना सहकार्य मिळत नाही या ठिकाणी निवास्थान असून ते बांदा येथे राहातात रुग्णांना गरजेच्या वेळी उपलब्ध होत नाही असा आरोप गावातील ग्रामस्थ यांनी केला होता या नुसार ग्रामपंचायत कडून तक्रारीची दखल घेऊन संबधित जिल्हा आरोग्य अधिकारी पालकमंञी उदय सामंत यांच्याकडे लेखी तक्रार ग्रामपंचात ठराव घेऊन देखील बंदली केली नाही त्यामुळे डाॅ. मेघा अंधारी यांची मोरगांव येथून तातडीने बंदली करावी यासाठी ७ एप्रिल रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी दिला आहे.

मोरगांव सरपंच निता नारायण देऊलकर,उपसरपंच अभिमन्यू अर्जून ठाकुर,तसेच गावातील ग्रामस्थ पांडूरंग कदम,समीर चिरमुरे,प्रज्योत पावसकर,शरद पालयेकर, यांनी आयोजित केलेल्या पञकार परिषदेत या उपोषण संदर्भात माहिती दिली.

You cannot copy content of this page