चिटणीस नाका येथील विद्युत तारा कोसळल्या

अचानक आलेल्या वाऱ्याने घडली घटना;मालवाहू गाडीवर कोसळल्या;मात्र अनर्थ टळला

सावंतवाडी ता.०५-:* अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शहरातील चिटणीस नाका परिसरातील विद्युत तारा खाली कोसळल्या असून, या तारा रस्त्यावरून जाणाऱ्या एका मालवाहू गाडीवर पडल्या आहेत. हा प्रकार आज रात्री पावणे नऊच्या सुमारास घडला आहे. त्या रस्त्यावरून त्यावेळी कोणी पादचारी किंवा अन्य गाडी जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. परंतु, या तारा रस्त्यावर कोसळल्याने शहरातील बत्ती गुल झाली आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

You cannot copy content of this page