ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा १० एप्रिल रोजी

सावंतवाडी ता.०६-:* येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दिला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा १० एप्रिल रोजी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सागर चव्हाण उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, प्रा.राजाराम परब, सिंधुदुर्ग तपासणी पथक लेखाधिकारी रवींद्र भवड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातीलउपक्रमशील व्यक्तींना ज्ञानदीप पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे मानकरी-नंदन घोगळे (देवगड) मनोहर परब-(कारिवडे), देव्या सूर्याजी, (सावंतवाडी, अन्वर खान (बांदा), लॉरेन्स मान्येकर (घोटगे-कुडाळ), सुधीर पराडकर (सावंतवाडी), विलास जंगले (केसरी-सावंतवाडी) या उपक्रमशील व्यक्तींना मंडळातर्फे सन्मान चिन्ह, गौरव पत्र,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे. सामाजिक भान ठेवून कार्य करणाऱ्या समाजाभिमुख व्यक्तींचा दरवर्षी त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या प्रामाणिक हेतूने हे कार्य मंडळातर्फे दरवर्षी केले जात आहे अशा विधायक कार्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन वाय. पी. नाईक, जावेद शेख, निलेश पारकर एस.आर. मांगले यांनी केले आहे

You cannot copy content of this page