Headlines

मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे उद्या वेंगुर्ला दौऱ्यावर…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील वेंगुर्ला भटवाडी येथे “नमो उद्यान विकसित करणे” या कामाचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजतासंपन्न होणार आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना मधून…

Read Full News

वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी सुमन कामत यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.१४-: ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी वायंगणी माजी सरपंच सुमन हरिश्चंद्र कामत यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्याशी विचारविनिमय करून तालुकाप्रमुख निलेश चमणकर यांनी ही निवड करण्यात…

Read Full News

वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई ; कॅम्प येथे 13 हजार 750 रुपयांचा गुटखा जप्त…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी 11.30 वा. वेंगुर्ला तहसील ऑफिस समोरील म्हाडा कॉलनीकडील कच्च्या रोडवर जात असताना अनिता अजित गावडे (45,रा. म्हाडा कॉलनी, कॅम्प वेंगुर्ला ) यांच्या ताब्यातील अवैध 13 हजार 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये तंबाखू विमल पान मसाला आदी दोन प्रकारच्या गुटखाचा समावेश आहे. याबाबत संशयित महिलेविरोधात वेंगुर्ला…

Read Full News

मालवणच्या अपर्णा मोर्जे हिचे जीपॅट परीक्षेत सुयश…

⚡मालवण ता.१४-:एम. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जीपॅट २०२६ परीक्षेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आणि मालवण दांडी येथील सुकन्या अपर्णा सत्यवान मोर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट २०२६ परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे जीपॅट ही एम फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा…

Read Full News

वायरी भूतनाथ येथे पारंपारिक शिवजन्मोत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१४-:शिवजयंती उत्सव मंडळ, वायरी भूतनाथ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘पारंपारिक शिवजन्मोत्सव साजरा होणार असून यानिमित्त दि. १९ व २० एप्रिल रोजी वायरी भूतनाथ येथील टिकम शाळेमागे विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता श्री…

Read Full News

कांदळगाव येथे आंब्याचे झाड कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.१४-:मालवण तालुक्यातील कांदळगाव देऊळवाडी येथील जयराम नारायण परब यांच्या घरा शेजारील जुने मोठे हापूस आंब्याचे मोठे कलमी झाड रविवारी सायंकाळी कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र घराच्या दर्शनी भागाचे तसेच घरासमोरील अंगणातील मोटरसायकलचे नुकसान झाले. कांदळगाव देऊळवाडी परिसरातील जयराम परब यांच्या घरा शेजारी जुने मोठे हापूस आंब्याचे कलम मुळातून कमजोर झाले…

Read Full News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा…

प्राजक्त चव्हाण:पावशी येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. कुडाळ : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना आपल्या आयुष्यात प्रत्येकाने माणूस म्हणून जगा. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा, असे आवाहन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी पावशी येथे केले.    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरयांची 135 वी…

Read Full News

कणकवलीत धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न.!

संघटना नव्हे, एक विचार नवलराज काळे यांचेप्रतिपादन.. कणकवली : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही एक संघटना नसून एक विचार आहे. तळागाळातील समाज बांधवांना न्याय देण्यासाठी काम करणारी ही सेवाभावी संस्था असून हे आपले कुटुंब आणि घर आहे. महासंघ जितका मजबूत करू, तितक्या ताकदीने समाजाचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे, असे…

Read Full News

कुडाळ न.प. च्या वतीने संविधान उद्देशिकेचे घरोघरी वाटप होणार…

कुडाळमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप शुभारंभ करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती…

Read Full News

दीना दुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रवाहात आणणे हीच खरी डॉ. बाबासाहेबांना आदरांजली…

प्रा अरुण मर्गज:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.. कुडाळ : विकासापासून वंचित असलेल्या दीनदुबळ्यांना, पददलितांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करताना ते बोलत…

Read Full News

You cannot copy content of this page